मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी आज टाका येथून पुण्याला रवाना 
औसा प्रतिनिधी 
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिव प्रतिष्ठान शिवली तसेच मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई आणि एच.व्ही देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन मौ.टाका ता.औसा जिल्हा लातूर या ठिकाणी 30 अॉक्टोंबर 2022 रोजी  करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन गावातील जेष्ठ नागरिक मा.सरपंच रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते आणि आयोजक सौ.रेखा शिवकुमार नागराळे मा.उपसभापती पंचायत समिती औसा तथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना राज्य उपाध्यक्ष तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे व शहराध्यक्ष प्रवीण कठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 अॉक्टोंबर 2022 रोजी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या नेत्र तपासणी शिबिरात 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असता त्यापैकी 26 रुग्णांना मोतीबिंदू व इतर डोळ्यांच्या आजाराची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉ राजूखान सय्यद व डॉ अजय यादव यांनी सांगितले असून सदरील रुग्णांची शस्त्रक्रिया ही थोड्याच दिवसात एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर पुणे येथे करण्यात येणार होते.त्या अनुषंगाने   आज दिनांक 11 डिसेंबर 2022 रविवार रोजी सकाळी  10 वाजता 30 लोकांची  तिसरी बॅच घेऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया सठी टाका येथून एच.व्ही देसाई आय हॉस्पिटल यांच्या  बसने पुण्याला रवाना करण्यात आले.या बस मध्ये तिसरी बॅच घेऊन त्यांच्या सोबत मनसे जिल्हा सचिव धनराज गीरी, राम प्रसाद दत्त,व दत्ताभाऊ लोहार  यांनी  औसा,शिवली व मौजे टाका तालुका औसा येथील रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी औसा तालुक्यातून मनसेच्या वतीने मोफत पुण्याला घेऊन जाणे व शस्त्रक्रिया करून परत आणणे असे शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. यांच्या आगोदर दोन बॅच 30 रुग्णांना घेऊन शस्त्रक्रिया करून परत आले आहेत. हया शिबिरात पुण्यात जाणे व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून परत आणणे हे सगळा खर्च मोफत करण्यात आले आहे. यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी औसा तालुक्यातील कलावंती झुंबर रसाळ (आंदोरा), केशरबाई भारत टेकांळे (टाका),दगडु साधु पाटोळे (टाका), चंद्रकांत हरीबा शिंदे (टाका),अफजल हनीफ मुलानी (टाका ),पदमावती व्यंकट सावंत (टाका), सुनीता गोवींद खंडागळे (औसा), सखुबाई खंडेराव सुर्यवंशी (औसा),जयराम संभाजी कांबळे (औसा), यशवंत गंगाधर सुर्यवंशी ( औसा), नागनाथ साधु कलमे (औसा), गजेंद्र विश्वनाथ शिंदे (टाका) जब्बार इस्माईल शेख (टाका) नवनाथ दादासाहेब शिंदे (टाका) शोभाबाई बाळकृष्ण वडे (औसा),एम बी एम 24 न्युज संपादक पत्रकार मुख्तार मणियार (औसा), बाळकृष्ण मनोहर वडे (औसा), मारुती नामदेव वाघमारे (टाका), कौशल्याबाई शिवाजी शिंदे (टाका),दगडु इस्माईल शेख (टाका)विश्रांतबाई प्रभाकर मोहले (माळंग्रा) या 21रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी व त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक असे एकूण 30 लोकांची तिसरी बॅच आज रोजी  मौ.टाका येथून पुण्याला रवाना झाले आहेत.

Post a Comment

0 Comments