शिवाजी वडगावे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
औसा प्रतिनिधी
श्री.शिवाजीराव वडगावे (माळी) यांनी आपला 84 व्या वाढदिवसानिमित्त श्री विरभद्रेश्वर प्रशाला औसा येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्री. शिवाजीराव वडगावे (माळी) यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 03/12/2022 वार शनीवार रोजी श्री विरभद्रेश्वर प्रशाला औसा येथील 384 विद्यार्थ्यानां सपत्नीक सौ. वत्सला वडगावे, राजेंद्र वडगावे,अनिता वडगावे ,अंकिता वडगावे व वैभव वडगावे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यांनी इतरत्र कोठेही आपला वाढदिवस साजरा न करता त्यांचा वाढदिवस एकदम साध्या पध्दतीने शालेय विद्यार्थ्यासोबत विद्येच्या मंदीरात शालेय साहित्य वाटप करुन साजरा केला.
यावेळी सुत्रसंचालन श्री सदाशिव कांबळे सर व प्रास्ताविक श्री. बी.एम.माळी सर यांनी केले. मुख्याध्यापक श्री.शिवकुमार मुरगे सर यांनी वडगावे परिवारानी कुठल्याही विद्यार्थ्याची आवडानिवड न करता सर्व विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप केल्याबद्दल वडगावे परिवाराचे आभार मानले. या कार्यक्रमास श्री.चंद्रशेखर हलमडगे, श्री.शिवाजी वैद्य, श्रीमती शोभा सिध्दपवार , श्रीमती प्रिती कांबळे, श्रीमती सुरेखा मुंजाने, श्रीमती अनुराधा लोहारे, श्री.दिंगबर शालगर आदी मान्यवर उपस्थीत होते.
0 Comments