वेळेत पैसे न भरलेल्या गाळयाचा फेर लिलाव तिसरा टप्पा प्रस्ताव प्रशासक काळात का! प्रदेश सरचिटणीस अमर भैया खानापुरे यांचा औसा नगरपरिषदेला सवाल 

औसा प्रतिनिधी 

औसा नगर परिषदेने सर्व नियमांची पायमल्ली करून बस स्थानक व सांस्कृतिक सभागृहात जवळील नगर परिषदेच्या गाळयाचा लिलाव करून गाळेवाटप केले होते. या वाटपात अनियमितता तर होतीच होती. शिवाय हितसंबंध जोपासण्याच्या हेतूने औसा नगर परिषदेने  लाखो रुपयांचे नुकसान करून हे गाळे वाटप केले होते. त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री मुजम्मिल शेख व आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सविस्तर सुनावणी होऊन विहित वेळेत लीलावात बोलीचे पैसे ज्या गाळेधारकाने औसा नगरपरिषदेकडे भरले नाहीत त्यांच्या गाळ्यांचा फेर लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लातूर यांनी दिले आहेत. उपलब्ध माहितीनुसार 75 टक्के गाळेधारकांनी अद्याप बोली रक्कम  भरलेली नाही असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर भैया खानापुरे यांनी म्हटले आहे. ते आज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री अमर खानापुरे पुढे म्हणाले आमची लढाई गाळेधारकांचे विरोधात नाही आम्ही नगर पालिका प्रशासनाच्या गैरकारभाराविरुद्ध लढत आहेत असं सांगून ते म्हणाले कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव घेण्यात आला आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याच लोकांना गाळे मिळतील अशी व्यवस्था तात्कालीन नगर प्रशासनाने केली. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्या गरजू तरुणांना हे गाळे मिळाले पाहिजे होते, त्यांना मिळाले नाहीत आणि या लिलावातून जेवढी रक्कम नगरपालिकेला  मिळायला हवी होती ती रक्कमही मिळाली नाही त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली असून पुढची कायदेशीर लढाई लढण्यासाठी आमचा विचार चालूच आहे. सर्व गोष्टीचा खुलासा या पत्रकार परिषदेत करणार नाही पण जोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत हा लढा चालतच राहणार आहे. आपल्या पत्रकार परिषदेत मुख्य रस्ता रुंदीकरणाचा तिसरा टप्पा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले औसा नगर प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव मार्च 2021 मध्ये शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. या प्रस्तावाची फाईल तकरारी नगर विकास मंत्र्यांच्या टेबलवर पोहोचवण्यात आली पुढेही चालूच राहील मात्र तात्कालीन नगर प्रशासनाने एवढे दिवस साधा प्रस्ताव सुद्धा का पाठवला नव्हता. सातत्याने लोकांना खोटं बोलत होते. लातूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिनांक 29 3 / 2019 रोजी प्रधान सचिव नगर विकास विभागाला हा प्रस्ताव पाठवण्यात आला असे सांगून श्री खानापुरे म्हणाले मुख्य रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागू नये लोकांना होणारा त्रास होत राहावा अशीच भूमिका तात्कालीन सत्ताधिकार्‍यांची होती म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रस्तावच पाठवला नाही असेही शेवटी अमर खानापुरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील शेख व विधीज्ञ शहानवाज पटेल उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments