विमा कंपनीला नुकसानीची माहिती न दिलेल्या शेतकऱ्यांना सुध्दा विमा मिळावे:उमर पंजेशा 
औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील नुकसानीची माहिती विमा कंपनीला न दिलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणे बाबत आमदार अभिमन्यू पवार यांना सामाजिक कार्यकर्ता उमर पंजेशा यांनी निवेदन सादर केले आहे.त्या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे 
वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज करण्यात येतो की, खरीप 2022 चा पिकविमा शेतकऱ्यांना भरलेला आहे. परंतु विमा कंपनीच्या निर्देशानुसार त्यांनी विमा कंपनीला नुकसानीची माहिती दिली नाही. या शुल्लक कारणामुळे विमा कंपनीने संबंधीत शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही. ही बाब अत्यंत चुकीची आहे. एकीकडे प्रचंड पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पिक हे गेले आहे. तसेच त्यामध्ये विमा कंपनीच्या अशा प्रकारच्या वागणूकीमुळे शेतकऱ्यांना कठीण वेळ आली आहे.

विमा कंपनीच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना लोकेशनवर जाऊन पिकांची फोटो टाकण्याबाबत कळविले होते. परंतु बरेचश्या शेतकऱ्यांच्या शेतात मोबाईल रेंज चा प्रॉब्लेम असतो तसेच कांही शेतकऱ्यांकडे तर मोबाईलही उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना विम्यापासुन वंचित रहावे लागत आहे.

तरी आमदार अभिमन्यू पवार यांनी  या बाबीकडे लक्ष देऊन तालुक्यातील हजारोंच्या संख्येने असणाऱ्या वंचित शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून देण्याबाबत योग्य ते सहकार्य करुन त्यांना पिकविमा मिळवून न्याय द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमर गुलाम हुसेन पंजेशा यांनी औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांना दिनांक 7 डिसेंबर बुधवार  रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ता उमर पंजेशा व त्यांच्या सोबत फारुख करपुडे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments