भादा - औसा रस्ता
लातूर ग्रामीणचा हद्दीतील रस्ता प्रगती पथावर
औसा तालुक्याचा कधी होणार?
बी. डी. उबाळे
औसा-लातूर ग्रामीण भागातील भादा - औसा रस्ता गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी बनविण्यात आला असून त्यानंतर केवळ दुरुस्ती एक दुरुस्ती या रस्त्याची झालेली आहे.
यामुळे हा रस्ता मोठे खड्डे पडून या रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ता असे चित्र या रस्त्यावरून प्रवास करताना दिसून येत होते.
 तर भादा - औसा या रस्त्यावर दिवसाकाठी लाखो वाहनांची रेलचेल सुरू असते त्यामध्येच सध्या ऊस वाहतूक ही अवजड वाहने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वाहत असताना या रस्त्याची अवस्था अगदी खराब झाली होती.परंतु सध्या भारतातील संदर्भात या जवळपास सात किमी अंतराचे काम सध्या प्रगतीपथावर असून हे काम लातूर ग्रामीण हद्दीमध्ये येत असल्याने आता या रस्त्याचे काम जवळपास अर्ध्यापर्यंत चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि हे सध्या प्रगतीपथावर असतानाच सध्या संमदरगा ते औसा या रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे.कारण हा भाग औसा मतदार संघामध्ये येत असल्याने या रस्त्याचे काम कधी मंजूर होणार आणि हा रस्ता कधी व्यवस्थित होणार अशी चिंता सध्या नागरिकांना लागली असून याबाबत औसाचे सक्रिय आमदार आणि जनतेच्या प्रश्नाची जाण असणारे जनतेचे नेते म्हणून औसा आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे सध्या जिल्ह्यातील नागरिकांचे आणि महाराष्ट्रातील आमदारांचे लक्ष लागले असून हे आमदार म्हणजे विकासाचे आमदार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आमदार अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात विकासाच्या वाटेवरून पोहोचले असून लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय आणि राजकीय वजनदार आमदार म्हणून त्यांच्याकडे सध्या राजकीय वर्तुळातून पाहिले जात आहे.
यामुळे हा भादा औसा रस्ता लातूर ग्रामीण मतदासंघ हद्दीतील पूर्ण होणार असून आता औशापर्यंत पोहोचणारा औसा मतदारसंघातील असलेला संमदर्गा मोड ते औसा हा जवळपास 5 किमी अंतराचा खराब असाअर्धवट रस्ता तो औशाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून पूर्ण करण्यात यावा.
अशी मागणी औसा तालुक्यातील आणि भादा परिसरातील नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments