गावगुंड जगदीश गायकवाड वर कडक कारवाई करा
वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
औसा प्रतिनिधी
जगदीश गायकवाड या गुंड व समाज विघातक प्रवृत्तीच्या व अनेक गुन्हेगारी केसेस असलेल्या व्यक्तीने अतिशय जहरी आणि नीच पातळीवर जाऊन आंबेडकर कुटुंबा बाबत गरळ ओकली आहे. हा आंबेडकर कुटुंबावरच नव्हे तर आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे कट कारस्थान दिसत आहे. या विषयावर समाजात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत आहे.
जगदीश गायकवाड यांच्या अवैध धंद्यांबद्दल अगोदर अनेक तक्रारी आहेत. या सर्व गोष्टीची
सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन
कारवाई सुरु केली पाहिजे. जगदीश गायकवाड यांना अभय देण्याचे काम महाराष्ट्र सरकारने करू नये.अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाउपाध्यक्ष आदेश आडसुळे यांनी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका महासचिव श्रावण कांबळे,औसा शहराध्यक्ष इलियास चौधरी, विष्णू कांबळे, सूर्यकांत उबाळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ओम खरात,अन्सुल आडसुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments