कबड्डी स्पर्धेत अजीम कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यात प्रथम
औसा प्रतिनिधी
औसा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा भादा येथे झालेल्या स्पर्धेत अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ औसा तालुक्यात सर्वप्रथम आला असून या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आता निवड झाली आहे. अजीम कनिष्ठ महाविद्यालयाने क्रीडा स्पर्धेमध्ये आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखून कबड्डी स्पर्धेत तालुक्यातून विजेते पद पटकावल्याबद्दल हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ अफसर शेख, प्राचार्य एन आय शेख, पर्यवेक्षक दानिश शेख, यांनी कबड्डीच्या विजेत्या संघाचे तसेच संघाला मार्गदर्शन करणारे श्री मोरे व पठाण यांचे अभिनंदन केले आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विजेता संघाचे अभिनंदन केले आहे.
0 Comments