आंतरराष्ट्रीय अपंग दिन दिव्यांगाचा औसा येथे सत्कार 
असा प्रतिनिधी
 आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 3 डिसेंबर रोजी अखिल भारतीय वारकरी मंडळ द्वारा दिव्यांग वारकरी सेवा दलाच्या वतीने औसा येथे दिव्यांगाचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कर्तव्यदक्ष तलाठी भागवत कोळी, बाबुराव वाघमारे, गजानन कल्लूरे, आत्माराम मिरकले, हरिभाऊ कुलकर्णी, अशोक देशमाने यांच्यासह इतर दिव्यांग बांधवांना सत्कार करून सर्वश्री राम कांबळे, शिवाजी कोल्हाळे, किरण कांबळे, आदित्य मिरकले, चौधरी इलियास, श्रीकांत चलवाड, उमेश बनसोडे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे युनूस चौधरी, नंदकुमार सरवदे आदींनी दिव्यांगांचा सन्मान केला.

Post a Comment

0 Comments