श्री मुक्तेश्वर मंदिर समितीच्या वतीने भारत कांबळे यांचा सत्कार
 औसा प्रतिनिधी
 औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिर च्या कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्त महिला कीर्तनकाराचा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधोडा येथील उपक्रमशील शिक्षिका भारत किसनराव कांबळे यांचा कर्तुत्वान महिला म्हणून मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वाघदरे, मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंग आप्पा औटी, आचार्य भातखंडे, विद्यालयाचे शिवरुद्र स्वामी, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मनमाड येथील ह भ प संजीवनी गडाख, नाशिक येथील ह भ प ज्ञानेश्वरी बागुल आणि भाग्यश्री पाटील, दवन हिप्परगा यांचे कीर्तन मंदिर समितीने आयोजित केले होते. महिला किर्तन महोत्सव निमित्त कर्तुत्वान महिला म्हणून भारत कांबळे यांना शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments