विकास लटूरेंची पदोन्नती;घेतला मंडळ कृषी अधिकारीचा पदभार
औसा प्रतिनिधी 
औसा-भादा येथील रहिवासी तथा तालुका कृषी विभागात काम करणारे एक शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून सबंध औसा तालुक्यात परिचित असणारे भादेकर भूमिपुत्र तथा गावाशी संपर्क ठेवून आणि आपल्या कर्तव्यात कोणतीही जाणीवपूर्वक उणीव न ठेवणारे कर्तव्यदक्ष कर्मचारी विकास डी लटूरे यांना नुकतीच पदोन्नती मिळाली असून आता मंडळ कृषी अधिकारी या पदाचा पदभार नुकताच त्यांनी लामजना गावचा घेतल्याचे समजते.
यामुळे लटुरे यांचे औसा तालुका कृषी विभागामध्ये कर्मचाऱ्याकडून अभिनंदन केले जात आहे तर भादा भूमिपुत्र असल्याने भादा गावातील नागरिक,मित्र परिवार यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे आणि भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments