साई शुगरचे चेअरमन राजेश्वर बुके यांची भादा गट कार्यालयास भेट
औसा-तालुक्यातील भादा येथे साई शुगर चे मुख्य प्रवर्तक तथा चेअरमन राजेश्वर बुके यांनी नुकतीच भेट दिली.
भादा येथील शेतकऱ्यांचे ऊस लागवड तारीख होऊन गेली असल्याने या नामवंत आणि बहु चर्चित कारखाना सभासदांचे ऊस घेऊन जात नसल्याने या भागातील आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात इतर कारखाने गाळप करीत आहेत.
यामध्ये सर्वात अग्रेसर असणारा साई शुगर साखर कारखाना,गोंद्री ता औसा हा असून या कारखान्याने या भागातील शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादकांना मोठा आधार दिला असून या भागातून आणि भादा गट कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून दररोज 40 टन ऊस घेऊन जाण्याचा विक्रम या साई कारखान्याने केला आहे.
यामुळे या भागातील शेतकऱ्यांना साई कारखान्याचा आधार मिळाला असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे काम हा कारखाना करीत असल्याने या भागाला साई शुगर चे मुख्य प्रवर्तक तथा चेअरमन राजेश्वर बुके यांनी नुकतीच भेट दिली आणि ऊस गाळप करण्यासाठी वाहतूक मोठ्याप्रमाणात करण्याचे वेगाने सुरू आहे.याकरिता या भागाची पाहणी करण्यासाठी चेरमन बुके यांनी भेट दिली.
0 Comments