महात्मा फुले ब्रिगेड तर्फे बाबुराव देशमुख यांचा सत्कार
 असा प्रतिनिधी
 ज्येष्ठ पत्रकार आणि अखिल भारतीय माळी महासंघाचे कार्यकर्ते बाबुराव देशमुख ननंदकर यांचा निलंगा येथे झालेल्या महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने माळी समाज वधू वर परिचय मेळाव्यामध्ये सत्कार करण्यात आला. माळी समाजाचे उत्कृष्ट संघटन आणि निलंगा तालुक्यामध्ये गतवर्षी सोयाबीन उत्पादनात प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे बाबुराव देशमुख नानांकर यांचा सत्कार सेवानिवृत्त न्यायाधीश शिवदास महाजन आणि संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज रविकांत महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबद्दल आदर्श शिक्षक किशनराव फुलमाळी गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मिश्रा, संजीव फुलमाळी, सत्यवान फुल माळी, राजीव फुल माळी, अभिषेक माळी, ओबीसी संघटनेचे औसा तालुका अध्यक्ष नागोराव माळी, महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सुधाकर माळी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments