तालुकास्तरीय कराटे व योगा स्पर्धेत अनुराग व योगीता या बहीण भावाचे घवघवीत यश !!
औसा प्रतिनिधी 
आज दि.28.11.2022 रोजी श्री रामनाथ विद्यालय अलमला ता.औसा येथे झालेल्या तालुका स्तरीय  कराटे स्पर्धेत व योगासने स्पर्धेत मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा येथील इयत्ता 9 वी तील कु. सावंत योगीता नेताजी वयोगट 17 व याच शाळेतील इयत्ता सातवीतील चि. सावंत अनुराग नेताजी  14 वर्ष वयोगटातून कराटे स्पर्धेत व योगासने स्पर्धेत  या बहीण भावाने प्रथम क्रमांक पटकावून कराटे असोशियन औसा व मुक्तेश्वर शाळेच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवले आहेत. याबद्दल श्री अजित ढोले सर , रेड्डी सर,मुख्याध्यापक श्री जलसकरे , संस्थाचालक  श्री.रविअप्पा राचट्टे ,व शिवलिंगप्पा औटी  तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहीण - भावाचे अभिनंदन व कौतुक करीत आहेत. तसेच सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments