लातूर च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री गिरीश महाजन 


आ. अभिमन्यू पवार यांच्या औसा येथील निवासस्थानी साधला कार्यकर्त्यांशी संवाद. 
 


औसा - लातूर जिल्ह्य़ाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल जिल्ह्य़ात विविध योजनेतून विकास कामांना अधिक गती देऊ असे सांगून यंदाच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या लातूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी सरकारने निकषाच्या पलीकडे जाऊन सव्वाचारशे कोटींची मदत वाटप केली आहे. आमच्या सरकारचा उदयोन्मुख काम सुरू असून यापुढेही विकासाच्या कामांच्या कामासाठी निधी पडू देणार नसल्याची ग्वाही लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. 

                    लातूरच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन यांनी (दि.३) नोव्हेंबर रोजी लातूर जिल्ह्य़ाचा पहिल्याच दौरा केला. यादरम्यान औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. यावेळी जमलेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पालकमंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्य़ाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.हे नुकसान तर भरून निघणारे नाही.पण शेतकऱ्यांना अपेक्षित मदत म्हणून आमच्या सरकारने एनडीआरएफ निकषाच्या पलीकडे जाऊन सव्वाचारशे कोटींच्या मदतीचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. राज्यात आमच्या सरकारचे उदयोन्मुख काम सुरू असताना गेले अडीच वर्षे घराच्या बाहेर एकही दिवस न पडता घरात बसून राज्याचा कारभार हाकणारे उध्दव ठाकरे यांनी हा प्रकल्प राज्याबाहेर गेला तो प्रकल्प राज्याबाहेर गेला आशा हावेत फैरी मारण्यास सुरूवात केल्याचे सांगून उध्दव ठाकरे यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. 

                            तसेच लातूर जिल्हयातील विकासाच्या दृष्टीने या दोन वर्षासह येणाऱ्या पाचदहा वर्षात निधी उपलब्ध करून देऊ असे सांगून आमदार अभिमन्यू पवार यांनी मागणी केलेल्या कासारसिरसी - कोराळी रस्ता व मागील काही कामे केलेल्या कामांच्या निधी संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, खासदार सुधाकर श्रंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी आ. विनायक पाटील,गोविंद केंद्रे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, लातूर , औसा भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता,कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, औसा नगरपरिषदेचे गटनेते सुनील उटगे, औसा शहरध्यक्ष लहू कांबळे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 
__________________________________________

जिल्ह्य़ाच्या विकासासाठी २५/१५ अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावी - आ.अभिमन्यू पवार 


 कासारसिरसी - कोराळी रस्ता संदर्भात पुनश्च निधी उपलब्ध करून देत लातूर जिल्ह्य़ातील विकासासाठी २५/१५ अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळात हि कामे मार्गी लावण्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

Post a Comment

0 Comments