बोरफळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुडुंब भरलेले गटारी तात्काळ काढणे व नागरिकांना व शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करण्यात यावा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची मागणी
औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील बोरफळ रस्त्याच्या अनेक दिवसापासून दोन्ही बाजूने कटगरगल्लीच्या लगत राम मंदिरच्या रस्त्यावरील गटारी भरलेले आहेत. नगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती करूनही नगरपालिका प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे बोरफळ वाटेला जाणारा शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. व घाण पाण्यातून नेहमी ये जा  करावा लागत आहे. व तसेच या रस्त्यावर दोन ते तीन स्मशानभूमी आहेत मराठा स्मशानभूमी, लिंगायत स्मशानभूमी, आणि राचट्टे स्मशानभूमी तसेच या मार्गावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी नगरपालिकेला दोन ते तीन वेळा पत्र देऊन नगरपालिका प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. वारंवार नगरपालिका प्रशासनाला विनंती करूनही दुर्लक्ष करीत आहेत. अनेक शहरांमध्ये गटारी तुटुंब भरलेले आहेत. गटारी साफसफाई करण्यात येत नाही. घंटा गाडी  वेळेवर येत नाही. गाडी जर आली तर या ठिकाणी कचरा आणून द्या, आम्ही तुमच्या दारात थांबणार नाही असे उडवा उडवीचे उत्तरे घाण कचरा गाडी चालवणारे हे ड्रायव्हर उडवा उडवीचे उत्तरे देतात व जनतेचे मालक असल्यासारखे वागणूक जनतेला करत आहेत. यांच्याकडे नगरपालिका प्रशासन कधी लक्ष देणार हे जनतेतून बोलले जात आहे. तसेच घाणीचे साम्राज्य जास्त असल्यामुळे डास मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. औसा शहरात मोकाट  जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे. तरी नगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. लहान वयोवृद्ध लेकरांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी पथ दिवे बंद आहेत. ते पथ दिवे सुरू करण्यात यावे व नाली गटारी त्वरित काढून जनतेला सुविधा देण्यात यावी नगरपालिका ची ही जबाबदारी असते. नगरपालिका प्रशासनाने वेळेवर काम नाही केले तर एमआयएमच्या वतीने नगरपालिकेवर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नगरपालिका प्रशासन दखल घ्यावी अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी नगरपालिकेला केली आहे.

Post a Comment

0 Comments