प्रा. सुधीर पोतदार यांनी केला पालकमंत्र्यांचा सत्कार 
औसा प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केलेले भाजप नेते सुधीर पोतदार यांनी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आपल्या सदिच्छा भेटीमध्ये प्रा सुधीर पोतदार व भागवत नेत्रे यांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार संघटन कार्यात योगदान देऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, प्रवीण कोपरकर, जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर राचट्टे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, शहर अध्यक्ष लहू कांबळे, कासार शिरशी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रा. सुधीर पोतदार व त्यांच्या सहकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments