पूजेच्या साहित्यांचा बाजार फुलला
औसा प्रतिनिधी
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह परंपरेनुसार चालत आलेली परंपरा आहे.
तुळशी विवाह निमित्त औसा बाजारपेठेत पूजेच्या साहित्याने बाजार फुलला असून औसा येथील लातूर वेस हनुमान मंदिर परिसरात पूजेसाठी लागणारे ऊस,बोर,झंडू फुले, चिंच, आवळे,पेरू, गाजर अशा विविध वस्तू ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी औसा येथे आणून विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.
तुळशी विवाह निमित्त पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केलेली असल्याचे शहरात दिसून आले.
दीपावली पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत विविध सणाची रेलचेल सुरू असते. तुलसी विवाह साठी प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करून सायंकाळी पूजेचे साहित्य मांडून विधीवत पूजा केली जाते व लग्न प्रमाणे मंगलाष्टक म्हणून श्रीकृष्णाची मूर्ती सोबत ठेवून तुळशी विवाह लावण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.
0 Comments