हाशमी चौक ते खादी भांडार भादा रस्त्यापर्यंत झालेलेअतिक्रमण काढण्यात यावी: सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची मागणी

औसा प्रतिनिधी 
 

  औसा शहरातील  हाशमी चौक ते खादी भांडार भादा रस्त्यापर्यंत दोन्ही बाजुने मोठे अतिक्रमण करण्यात आलेले आहे. दोन्ही बाजुने शासनाच्या योजने अंतर्गत घरकुलाचे काम सुरु आहे. सदर काम करीत असताना बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकुन रस्त्यास अडथळा करीत आहेत. सद्या गळीत हंगाम सुरु झाला आहे. तसेच या रस्त्यावरुन ८ ते १० साखर कारखान्यांना या मार्गाने ऊस वाहतुक करण्यात येते. ऊस वाहतुक करण्यासाठी गाडी चालकांना व ट्रॅक्टर चालकांना मोठी कसरत करावी लागते. मागील काही दिवसापासून कारखाने सुरु झाले असून रस्त्यावर पडलेला बांधकाम साहित्य विट, माती, दगड रस्त्यावर पडलेले असून त्याकडे आपले दुर्लक्ष दिसून येत आहे. यापूर्वी २ वेळा आपल्याला पत्रव्यवहार करुन आपण कसल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अपघात झाल्यास आपले कार्यालय, जबाबदार राहील. तसेच हनुमान मंदीर ते खादी भांडार कार्यालयापर्यंत दोन्ही बाजुने मोठे अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे व रस्ता खुला करून वाहतुकीस अडचण 
 होणार नाही. अशी व्यवस्था करण्यात यावी.. तहसील कार्यालय, औसा तरी आपण जातीने लक्ष देऊन ग्रामिण भागातून वाहतुक करणाऱ्या लोकांना व शेतकऱ्यांचे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रस्त्यास होत असलेली अडचण दूर करण्यात यावी. अन्यथा एम आय एम च्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा इशारा  एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार यांना व तसेच उपअभियंता बांधकाम उपविभाग औसा व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिनांक 28 नोव्हेंबर 2022  सोमवार रोजी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments