औसा शहरात मुख्य रस्त्यावर नालीचे घाण पाणी साचल्याने नागरिक वैतागले : सय्यद मुजफ्फर अली इनामदार 
 औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील मुख्य रस्त्यावर गटारी तुडुंब भरुन घाण पाणी त्या गटारीतून  रस्त्यावरून खड्यात पाणी साचत  आहे.व रस्त्यावर पाणीच पाणी साचल्यामुळे नागरिकांची  दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील लातूरवेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद पर्यंतच्या तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून रखडले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पायी चालणाऱ्या व्यक्तीसह मोटरसायकल व चार चाकी वाहनांना सुद्धा या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. नगर परिषदेस वारंवार कल्पना देऊनही या रस्त्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. पावसात नगर परिषदेच्या कमालीच्या हलगर्जीपणामुळे मागील अनेक दिवसापासून तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम होत नसल्यामुळे व्यापारी व ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेला अतोनात त्रास होत आहे. त्यातच  दिनांक 25 नोव्हेंबर रोजी गटारी भरल्यामुळे  रस्त्यावर पाणी साचले येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे शिंतोडे अंगावर उडत असल्यामुळे आभाळवृद्ध महिला व विद्यार्थी यांना मोठी कसरत करून या रस्त्यावरून जाण्याची वेळ आली असून या कामी नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे.अशी  मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी नगरपरिषदेला केली आहे.

Post a Comment

0 Comments