मोमीन गल्ली येथील नालीच्या चेंबरवर झाकण बसवा: उमर पंजेशा 
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील 
 मोमीन गल्लीतील हंचाटे बोळ मधील नालीवरील चेंबर  हे उघडे असल्या कारणाने व तेथे रस्ता हा अरुंद असल्याकारणाने व त्याठिकाणी लाईट नसल्याने त्या चेंबरमध्ये लहान मुले व गाडीवाले नेहमी पडत आहेत. त्यामुळे त्यांना दुखापत होत आहे. तरी मुख्याधिकारी यांनी त्या चेंबरवर त्वरीत झाकण बसवून होणारे अपघात व दुखापती थांबवावेत अशी निवेदनाद्वारे  विनंती केली आहे. तसेच सदर ठिकाणी लाईट बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी. तरी वरील प्रश्नावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमर गुलाम हुसेन पंजेशा  यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना आज रोजी  निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी निवेदन सादर करताना सामाजिक कार्यकर्ते उमर पंजेशा,व त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष मेहराज शेख यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments