अमर खानापुरे यांच्यातर्फे पाटील परिवाराचे सांत्वन
 औसा प्रतिनिधी
 दैनिक मनोगतचे संपादक राजू पाटील यांचे वडील शंकरराव दादाराव पाटील यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर खानापुरे यांनी नाहोली ता. औसा येथे त्यांच्या निवासस्थानी मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या समवेत युवक काँग्रेसचे जयराज कसबे, किशोर पारुडकर, सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे इत्यादी उपस्थित होते. अमर खानापुरे यांनी राजू पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील, शिवकुमार पाटील, कैलास पाटील, कल्याण पाटील, मनमत आप्पा आंबेगाव यांच्याशी चर्चा करून पाटील परिवाराचे सांत्वन करून धीर दिला.

Post a Comment

0 Comments