*सिरसाळा ग्रामपंचायत फय्याज कुरेशी यांनी सरपंच पदाची निवडणूक लढविण्याची जनतेतुन होत आहे मागणी!*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या  समजल्या जाणाऱ्या सिरसाळा ग्रामपंचायत फय्याज जनिमियाँ कुरेशी यांनी गावच्या सर्वांगीन विकासासाठी सरपंच पदाची निवडणूक लढवण्याची  जनतेतुन मागणी जोर धरत आहे.
     सिरसाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य तथा परळी पंचायत समितीचे मा.उपसभापती जनिमियाँ कुरेशी यांचे चिरंजीव फय्याज कुरेशी यांचा  सिरसाळा सह परिसरात संपुर्ण दांडगा जनसंपर्क आहे. सर्वांना त्यांचा परिचय असुन त्यांनी भागातील गोर-गरीब व सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला असुन जनतेच्या प्रत्येक समस्येसाठी धावणारे व सामाजीक कार्यात अग्रेसर असतात तसेच माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व वाल्मिक आणा कराड यांचे अत्यंत  विश्वासू आहेत. विशेष गावातील संपुर्ण माहिती व जनतेच्या समस्यांच्या अभ्यास आहे. त्यांचा सर्वस्तरातुन परिचय आहे. यामुळे सिरसाळा ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य तथा परळी पंचायत समितीचे मा. उपसभापती जनिमियाँ कुरेशी यांचे चिरंजीव फय्याज कुरेशी यांनी लढवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Post a Comment

0 Comments