तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणासाठी व्यापारी व जनतेने सहकार्य करावे: आमदार अभिमन्यू पवार 
औसा प्रतिनिधी
 औसा शहरातील लातूर वेस हनुमान मंदिर ते ऐतिहासिक जामा मज्जिद पर्यंतच्या तिसरा टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणासाठी शहरातील व्यापारी व नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता विकास कामासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्यापाऱ्यासोबत आयोजित बैठकीत आमदार अभिमन्यू पवार बोलत होते. यावेळी पुढे बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की औसा शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी मी आमदार नसताना व नगरपालिका विरोधी पक्षाच्या ताब्यात असतानाही मागणी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी 45 कोटी रुपयांची योजना मंजूर करून आणली. शहराच्या तिसरा टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम हे अत्यंत महत्त्वाचे असून हा प्रस्ताव रहदारीसाठी अत्यंत अडचणीचा झाल्यामुळे नागरिक व व्यापारी वर्गांना त्रास होत आहे. या कामासाठी आपण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करून रस्ता रुंदीकरणाचे काम 2  महिन्यापर्यंत मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन व्यापारी व नागरिकांच्या बैठकीत आमदार महोदयांनी दिले. सुनील उटगे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गिरीश उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कापड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि सतीश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सराफ असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम त्वरित मार्गे लावावे अशा आशयाचे निवेदन दिले. या बैठकीसाठी शहरातील व्यापारी तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार बाजपाई, ॲड मुक्तेश्वर वागदरे, अँड अरविंद कुलकर्णी, कंठप्पा मुळे, शहराध्यक्ष लहू कांबळे, धनंजय परसणे, राम कांबळे, संतोष चिकुर्डेकर, महिला आघाडीच्या कल्पना ताई डांगे, सोनाली गुळबिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments