खा. राहुल गांधींनी साधला टाका येथील कार्यकर्त्यांशी संवाद
औसा प्रतिनिधी
येथील लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजित शिंदे यांनी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सोमवार रोजी सहभाग नोंदविला. त्यांनी राहुल गांधी यांच्या समवेत वसपांग्रा फाटा ते हिंगोली पर्यंत असा 25किलोमीटर पायी प्रवास केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी सोबत चालत असणाऱ्या शिंदे यांची खा राहुल गांधी यांनी बोलावून आपुलकीने विचारपूस केली. यावेळी राहुल यांनी शिंदे यांच्याशी संवाद साधत असताना लवकरच बदल होईल असा विश्वास व्यक्त केला. भारत जोडो यात्रेतील सहभाग आणि थेट राहुल गांधी यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांशी आपुलकीने साधलेला संवाद हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे अनेक तरुण कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होत आहेत. याप्रसंगी
0 Comments