ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना हरभरा बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या -सय्यद मुजफ्फर अली इनामदार 

औसा प्रतिनिधी 

आॅनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना हरभरा बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या अशी मागणी एम आय एम औसा व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.त्या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे,
 औसा तालुक्यातील व शहरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पेरणीसाठी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन करुनही शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नाही व एक ऑनलाईन करण्यासाठी जवळपास ३०० रु. खर्च करुनही शेतकऱ्यांच्या हातात नुसत कागद पडत आहे. बियाणे कोठे आहेत दिसत नाही. शेतकऱ्यांना परमीट दिलेल्या दुकानदारांकडे परमीट घेऊन गेले असता बियाणं आमच्याकडे उपलब्ध नाहीत. असे उडवा उडवीची उत्तरे ओसा शहरातील महाबीज कंपनीच्या एजन्सी दिलेल्या दुकानदार शेतकऱ्यांना देत आहेत. शासनाकडे बियाणेच नव्हते तर मग शेतकऱ्यांना परमीट घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे खर्च का करावयास लावले. असा प्रश्न निर्माण होत आहे.

महाबिज कंपनीचे बियाणे काळ्या बाजार विक्री होत आहे का? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. यापूर्वी खरीप हंगामासाठी महाबिज कंपनीचे सोयाबीन बियाणासाठी शेतकऱ्याना अशीच कसरत करावी लागली होती. शेतकऱ्यांच्या योजना कृषी खात्याकडून आलेल्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या योजना फक्त कागदावरच दिसून येतात. त्यावर सर्वसाधारण शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहे.

तरी मा. साहेबांनी बियाणे विकणाऱ्या दुकानदाराकडे किती माल आला किती लोकांनी Q अर्ज केले होते. याची सखोल चौकश करावी व परमीट दिलेल्या शेतकन्यांना बियाणे उपलब्ध करुन द्यावी, अन्यथा एम आय एम च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 
 सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार,व  तालुका कृषी अधिकारी यांना 14 नोव्हेंबर सोमवार रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments