मसल फिट स्टुडिओ या अद्यावत जिमचा उद्या शुभारंभ 
औसा प्रतिनिधी
 औसा येथे डॉ. असलम पटेल यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अद्यावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज अशा मसलफिट स्टुडिओ या अद्यावत जिमचा भव्य शुभारंभ आज रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक डॉ शांतवीर शिवाचार्य महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मौलाना सय्यद कलीमुल्ला यांच्या शुभहस्ते खा. ओमराजे निंबाळकर, अभिमन्यू पवार ,अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजेश पाटील, डॉ.खयूम खान, तहसीलदार भरत सूर्यवंशी, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी औसा शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी मसल फिट या अत्याधुनिक जिमच्या उद्घाटन प्रसंगी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन डॉ असलम पटेल, मोहसिन पटेल, मुजाहिद पटेल, जाफर पटेल यांच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे ठिकाण शिफा हाइट्स नगर परिषद सांस्कृतिक सभागृहासमोर मेन रोड औसा.

Post a Comment

0 Comments