बुधोडा येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम ग्रामस्थांनी बंद पाडले
 औसा प्रतिनिधी
 औसा तालुक्यातील बुधोडा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रामचिलमे यांच्या घरापासून अंकुश भुते यांच्या घरापर्यंतचा अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करीत ग्रामस्थांनी काम बंद पडले आहे. सदरील सिमेंट रस्ता आणि दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे नदीवर फरशा टाकल्या आहेत तर सिमेंट रस्त्यावर मुरूम टाकून रोलर ने दबाई करून माती असलेल्या मुरुमावरच सिमेंट काँक्रीट चे काम करीत असल्यामुळे ग्रामस्थांनी या रस्त्यावर अगोदर बेड कॉंक्रीट करावे आणि त्यानंतर सिमेंट काँक्रीट चे काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे सिमेंट रस्त्याचे व दोन्ही बाजूच्या नादीचे बांधकाम होणे आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य बालाजी मिटापले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली असून सदरील निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे कामाचा दर्जा चांगला करण्यासाठी आपण संबंधितास सूचना देत आहोत असेही बालाजी मिटापले यांनी म्हटले.

Post a Comment

0 Comments