मोमीन गल्ली येथील अनवर करपुडे ते भंडारी यांच्या घरापर्यंत पाण्याची समस्या मिटणार :उमर पंजेशा
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील मोमीन गल्ली येथील अनवर करपडे यांच्या घरापासून ते भंडारी यांच्या घरापर्यंत गेल्या 4 ते 6 वर्षांपासून नळाला पाणी येत नसल्याबाबत गेल्या 4 ऑगस्ट 2022 रोजी समाजसेवक उमर गुलामहुसेन पंजेशा व मोमीन गल्लीतील स्थानिक नागरिक अनवर करपुडे,मुसा अली मोमीन, मुल्ला अरबाज गौसपाशा,जैनोद्दीन बशीरसाब जर्दी,हांजी अजीज करपुडे, मैनुद्दीन जिलानी करपुडे,खलील जर्दी,संजय भंडारी यांनी नगरपरिषद औसा येथे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या पत्राचे सविस्तर वृत्त असे मौजे मोमीन गेली येथील रहिवासी असून अनवर करपुडे यांच्या घरापासून भंडारी यांच्या घरापर्यंत आम्हा अर्जदारांच्या घरांना मागील 4 ते 5 वर्षापासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणी येत आहेत. आमची पाईपलाईन ही अत्यंत जुनी असून ती बदलणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही मागील दिनांक 13-04 -2022 रोजी संदर्भीय अर्जान्वये वेळोवेळी निवेदने अर्ज दिल्यानंतर आमचे सोबत येऊन आमची पाईपलाईन बदलण्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे परंतु बजेट नसल्यामुळे काम करू शकत नाही असेही उत्तरे देत पालिका टाळाटाळ करीत आहे. तरी मुख्याधिकारी यांना लवकरात लवकर आमची पाईपलाईन दुरुस्ती करून आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी. अशी मागणी पुन्हा 4 आॅगस्ट 2022 रोजी निवेदनाद्वारे केली होती. मोमीन गल्ली येथील अनवर करपुडे ते भंडारी यांच्या घरापर्यंत पाण्यासाठी सतत पाठपुरावा करून समाजसेवक उमर पंजेशा यांनी प्रत्येक वेळेस संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून व त्यांच्याशी संपर्क करून त्या कामास लवकरात लवकर करावे अशी मुख्याधिकारी यांना विनंती केली.मुख्याधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेऊन मोमीन गल्ली येथील नागरिकांची पाण्याची समस्या पाहून 4 संप्टेबरला सोनवणे यांना आदेश देण्यात आले. शेवटी या कामाला दिनांक 6 नोंव्हेबर 2022 रवीवार रोजी सुरुवात करण्यात आली. यावेळी उमर पंजेशा यांनी अनवर करपुडे ते भंडारी यांच्या घरापर्यंत लवकरात लवकर तेथील स्थानिक नागरिकांना नळाचे पाणी नगरपरिषदे मार्फत देण्याचे आश्वासन दिले आहे. मोमीन गल्ली येथे अनवर करपुडे ते भंडारी यांच्या घरापर्यंत 5 वर्षांपासून पाण्याची समस्या होती ती आता पाण्याची समस्या मिटणार आहे. लवकरच येथील स्थानिक नागरिकांना पाणी मिळणार आहे.असे उमर पंजेशा यांनी सांगितले.यावेळी स्थानिक नागरिकांनी काम चालू केल्याबद्दल उमर पंजेशा यांचे आभार मानले आहे.
0 Comments