ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी 80 हजार रुपये शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी: सय्यद मुजफ्फर अली इनामदार 
औसा प्रतिनिधी 
 संततधार पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा व इनामी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी एम.आय. एम.औसाच्या वतीने पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.त्या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे, मराठवाड्यात सर्वच भागात पेरणी उशीरा झाली व पुन्हा पावसाळा सुरु झाला पेरणी करण्यात आली. काही खत बी कंपन्यांनी बियाने खराब दिल्यामुळे शेतकऱ्याची फसवणुक झाली व शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी केली, परंतु सतत पाऊस झाल्यामुळे तेही हाताचे पिक हातातून निघून गेले आहे. व एक्करी पेरणीसाठी ३० ते ३५ हजार रु. खर्च करावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. तसेच उत्पन्नामध्ये ८० टक्के घट झाली आहे व २० टक्के माल आलेले आहे.

 तरी शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत म्हणून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे व हेक्टरी ८० हजार रु. सरसकट मदत देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत देण्यात येते व त्यापासून बरेचशे शेतकरी देवस्थान इनामी जमीन असलेले बरेचश्या ठिकाणी शेतकऱ्यांची व सेवा करणाऱ्यांची नावे मालकी रकान्यातून कमी केली असून अशा शेतकन्यांना त्याचा लाभ मिळत नाही व शासनाच्या योजनेपासून मंदीर मस्जीद इनामी जमीन यांना मदत मिळत नाही. वास्तविक सदर जमीनी ही हजारो वर्षापासुन नावावर आहेत. हे शेतकरी या शासनाच्या योजनेपासून वंचित राहतात तरी मा. पालकमंत्री यांनी वंचित राहणाऱ्या इनामी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभा मिळवून देण्यात यावा व सदर जिल्हाधिकारी, तहसिलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांना इतर अधिकार मधील असलेल्या यांच्या नावे मदत देण्यात यावी. जेणे करून अनेक वर्षांपासून वंचित राहत असलेल्या या घटकांना न्याय मिळेल. अशी मागणी एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 गुरूवार रोजी पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments