सोनवळकर गल्ली येथील सतीष नाईक  ते वर्मा यांचा घरापर्यंत 8 ते 10 घरांना नळाला पाण्याची सोय करा: उमर पंजेशा 

 औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील सोनवळकर गल्ली येथील सतीष नाईक यांच्या घरापासून ते वर्मा यांच्या घरापर्यंत असे एकूण 10 घरांना नळाला पाणी  येत नसल्याने तेथील नागरिक 10 वर्षांपासून पाणी विकत घेत आहेत.व  आडाचे पाणी घेऊन वापर करावा लागत आहे. तरी मुख्याधिकारी साहेबांनी प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिक खाजाभाई बागवान, सोनवळकर वर्मा, खंगले,मदन बिसेनी,केशव कठारे, आदिच्या घरांच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती थांबवावी व इथल्या 8 ते 10 घरांना  नळाला पाणी येण्याची सोय करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमर गुलाम हुसेन पंजेशा यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी निवेदन देताना त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, अँड सय्यद मुस्तफा इनामदार यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments