औसा येथे होणाऱ्या इस्तेमा स्थळास भेट देऊन बसवराज पाटील यांनी केली पाहणी
 औसा प्रतिनिधी
 दिनांक 5  व 6  डिसेंबर 2022 रोजी औसा येथे लातूर जिल्हास्तरीय इस्तेमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लिम धर्मीय बांधवांच्या वतीने या धार्मिक सोहळ्याच्या स्थळाची काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी इस्तेमा स्थळास भेट देऊन कार्यक्रमाचे पाहणी केली. मुस्लिम धर्म बांधवांना धार्मिक शिकवण देण्यासाठी इस्तेमा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते‌ संपूर्ण जगामध्ये शांतता नांदावी आणि प्रत्येक नागरिकांनी इतरांचा आदर करीत आपल्या धर्माच्या निती  नियमाचे पालन करावे असा उपदेश या कार्यक्रमातून करण्यात येतो ‌ अशी माहिती या ठिकाणी मौलाना यांनी उपस्थितांना दिली‌. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, पंचायत समितीचे माजी सदस्य बसवराज धाराशिवे, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत राचट्टे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख शकील, प्रणील उटगे, मौलाना कलीम मुल्ला, माजी नगरसेवक अफसर पटेल, गुलाब शेख, माजी उपनगराध्यक्ष सय्यद खादर, युवा नेते सुलेमान शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित .होते. इस्तेमा संयोजन समितीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, बसवराज धाराशिवे, संगमेश्वर ठेसे युवक काँग्रेसचे हनुमंत राजट्टे, प्रणील उठगे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवसीय जिल्हास्तरीय इस्तेमा कार्यक्रमांमध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्यामुळे या कार्यक्रम स्थळाची प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी उपस्थित होणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी निवारा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था आधी सर्व बाबींची माझे आमदार बसवराज पाटील यांनी पाहणी करून कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. नियोजन समितीच्या वतीने या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण श्री बसवराज पाटील यांना संयोजन समितीने दिले.

Post a Comment

0 Comments