कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्त मुक्तेश्वर मंदिरात 3  दिवस कीर्तन महोत्सव
 औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त 29 नोव्हेंबर ते 1  डिसेंबर या कालावधीत 3  दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 29 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. संजीवनी गडाख मनमाड यांचे कीर्तन होणार असून कीर्तन महोत्सवाचा उद्घाटन सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते
 आणि श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंग आप्पा औटी ह. भ. प. दत्तात्रेय पवार गुरुजी व श्रीमती सरस्वतीबाई कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वरी बागुल नाशिक यांचे कीर्तन होणार असून दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी किर्तन महोत्सवाचा समारोप विधान परिषद सदस्य रमेश आप्पा कराड, यांच्या हस्ते व डॉ बसवराज पटणे, सौ भारतबाई हलकुडे,
युवा नेते सुनील उटगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवभक्त परायण भाग्यश्री पाटील धवन हिप्परगा यांच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे 3  दिवसीय कालावधीमध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकाराच्या कीर्तनाचा लाभ सायंकाळी 6  ते 9  या वेळेत भाविक भक्तांना होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी श्री मुक्तेश्वर मंदिर कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवानिमित्त दर्शन व कीर्तन सर्वांनी याचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री मुक्तेश्वर देवालय न्यास यांच्या वतीने करण्यात येते.

Post a Comment

0 Comments