संविधान दिनाचे औचित्य साधून भीमनगर औसा येथे प्रस्ताविका वाचन व प्रत वितरण
औसा प्रतिनिधी
,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल अभ्यास करून देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान दिले त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून देशाने हे संविधान स्वीकारले आणि देशात खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक म्हणजे सर्वात मोठ्या लोकशाहीचे राज्य सुरू झाले. त्यामुळे 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून भीम नगर बौद्ध विहार येथे सौ.कल्पनाताई डांगे प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजप यांच्या नेतृत्वात व औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार व चित्राताई वाघ प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा भाजप यांच्या संकल्पनेतून भीम नगर, बौद्ध नगर, समता नगर ,आणि संजय नगर भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना एकत्रित करून सामूहिकरीत्या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच उपस्थितांना संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत वितरित करण्यात आली. प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भीम नगर येथील बुद्ध विहार मध्ये संविधान दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
संविधान दिनानिमित्त आयोजित प्रस्ताविका वाचन कार्यक्रमास अनेक नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments