भगतसिंग कोश्यारीच्या विरोधात औसा येथे कडकडीत बंद
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायां बद्दल अवमानास्पद वक्तव्य केल्यामुळे औसा शहर व तालुक्यात शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवप्रेमी जनतेच्या वतीने औसा शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढून औसा बंदचे आवाहन केले. औसा शहरातील सर्व व्यापारी आस्थापनांनी कडकडीत बंद पाळला तसेच शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवरायांचे महान कार्य असताना सुद्धा संवैधानिक पदावर असणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी अवमानास्पद उद्गार काढल्यामुळे शिवप्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे समस्त शिवप्रेमी जनतेच्या वतीने औसा बंदचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, माजी पंचायत समिती सदस्य बसवराज धाराशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, माजी नगरसेवक भरत सूर्यवंशी, गोविंद जाधव, अंगद कांबळे, जयराज कसबे, खुंदमीर मुल्ला, सुलतान शेख, व लियाकत पठाण, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश भुरे,
तालुकाप्रमुख सतीश शिंदे, नागेश मुगळे, संतोष सोमवंशी,संजय उजळांबे, दत्तोपंत सूर्यवंशी, श्याम भोसले, प्रदीप मोरे, मनोज गरड, पुरूषोत्तम नलगे, गोविंद जाधव, कृष्णा सावळकर, अँड शिवाजी सावंत, मुकेश तोंवर, बालाजी सूर्यवंशी, दिनेश ज जावळे, धनराज गोमदे, वैजनाथ सुर्यवंशी, रंगनाथ कदम,राहुल मोरे, धर्मराज पवार,सोनाली गुळबिले इत्यादीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना राज्यपाल भगतसिंग कोसरी यांची हकालपट्टी करावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन सादर केले. औसा शहरातील सर्व व्यापारी स्थापना दिवसभर बंद मध्ये सहभागी झाल्यामुळे शंभर टक्के बंद यशस्वी झाला.
0 Comments