महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या माजी राज्यपालाचा निषेध;संभाजी सेना आक्रमक 
बी डी उबाळे
लातूर येथील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 20 22 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर निषेध करण्यात आला.
संभाजी सेनेच्या वतीने सडक्या बुध्दीच्या माजी राज्यपाल कोशारीचा जाहीर निषेध करण्यात आला. प्रत्येक वेळेस जर हा सडका भाजपपाल छत्रपती शिवाजी महाराज याच्यावर बेताल वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना दुखवत असेल तर याला तात्काळ महाराष्ट्रा बाहेर हाकलून देण्यात यावे.जर हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला जमत नसेल तर संभाजी सेना कायदा हातात घेऊन या राज्यपालाचे धोतर फेडून धिंड काढेल!याला जबाबदार केंद्र सरकार आणी राज्य सरकार असेल अशा मुर्ख माणसाला उच्च पदावर बसवुन समाजात तेढ निर्माण करीत असेल तर तात्काळ कारवाई झालीच पाहीजे.संभाजी सेना हे छत्रपतींच्या महाराष्ट्रात खपवून घेणार नाही,यांना जाहीर घोषणा देत निषेध व्यक्त केला.यावेळी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने, धर्मराज पवार, सुधाकर सोनवणे, शशिकांत माने,बालाजी घोडके,लखन साबळे,प्रसाद पवार, आमोल कांदे,बालाजी गायकवाड आदी या निषेध आंदोलनामध्ये पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments