राजू पाटील यांच्या परिवाराचे माजी आमदार बसवराज पाटील आणि वैजनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन
औसा प्रतिनिधी
दैनिक मनोगतचे संपादक राजू पाटील आणि लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील यांचे वडील शंकरराव दादाराव पाटील यांचे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळमुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील आणि लातूर ग्रामीण चे माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी नाहोली औसा येथे राजीव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,पंचायत समितीचे माजी सदस्य बसवराज धाराशिवे, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत राजट्टे, महेंद्रनाथ भादेकर, सूर्यकांत पाटील, दादा कोपरे, अन्वर पटेल, बाबुराव शिंदे आदि उपस्थित होते. माझी मंत्री बसवराज पाटील आणि माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या स्मृतीला उजाळा दिला.
0 Comments