ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यात घुमणार औशाचा भूमिपुत्राचा आवाज
 औसा प्रतिनिधी
 श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक 19 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये आळंदी देवाची येथे भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये औसा तालुक्यातील किनीथोटे येथील भूमिपुत्र तथा पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य रमेश भुजबळ यांचा सुमधुर आवाज घुमणार आहे. ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री 9:30 वाजता अध्यात्मशांती पीठ आळंदी देवाची येथे तर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत जीवन सम्राट डॉ पारनेरकर महाराज मंदीर येथे भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्वश्री रमेश भुजबळ, इंडियन आयडॉल ऋषिकेश शेलार, ऋषिकेश अडसूळ यांचे गायन होणार असून रोहित अडसूळ हे तबल्याची साथ करणार आहेत. टाळ ध्वनी रोहन जाधव यांचा असून ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित भजन संध्या कार्यक्रमाचा भाविक भक्त व श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक विष्णू महाराज सगळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments