औसा शहरात मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक वैतागले
 औसा प्रतिनिधी 
औसा शहरातील मुख्य रस्त्यावर नगरपरिषदेच्या नळाचे पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचल्यामुळे नागरिकांची शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील लातूरवेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद पर्यंतच्या तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून रखडले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पायी चालणाऱ्या व्यक्तीसह मोटरसायकल व चार चाकी वाहनांना सुद्धा या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. नगर परिषदेस वारंवार कल्पना देऊनही या रस्त्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. पावसात नगर परिषदेच्या कमालीच्या हलगर्जीपणामुळे मागील अनेक दिवसापासून तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम होत नसल्यामुळे व्यापारी व ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेला अतोनात त्रास होत आहे. त्यातच शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे शिंतोडे अंगावर उडत असल्यामुळे आभाळवृद्ध महिला व विद्यार्थी यांना मोठी कसरत करून या रस्त्यावरून जाण्याची वेळ आली असून या कामी नगरपरिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरिकात होत आहे.

Post a Comment

0 Comments