राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसाच्या वतीने विविध मागणीचे मुख्याधिकारी यांना निवेदन
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील अनेक पोलवरील हायमास्ट व LED लाईट बंद व नादुरुरत असुन त्या तात्काळ दुरुरत करण्यात यावी, शहरातील अनेक रोडवर मुरुम च आवश्यक त्या ठिकाणी पाईप टाकण्यात यावे, प्रभाग क्रं. 2 मधील हनुमान नगर, वडार वरती येथील न. प. च्या सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशा विविध मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.त्याचे सविस्तर वृत्त असे ,
औसा शहरातील अनेक हायमास्ट व इतर पोलवरी LED लाईट बंद व नादुरुस्त आहेत त्यामुळे नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सद्या चोऱ्याचे प्रमाण जास्त वाढले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईट असणे अत्यंत गरजे आहे. तसेच सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातील अनेक भागात रोडवर मुरुम आवश्यक त्या ठिकणी पाईप टाकण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
औसा नगर परिषदेकडून हनुमान नगर वडार बस्ती MIDC कॉर्नर औसा येथे सार्वजनि शौचालय बांधण्यात आलेले आहे. सदरील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाले आहे. जसे की शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत. सर्व नळ नादुरुस्त झालेले आहेत. तसेच सेफ्टी टॅन्क लिक होऊन सदरील पाणी रोडवर व शौचालचाच्या बाजुला असलेल्या पाण्याच्या टाकीज साचत आहे. सदरील दुर्गंधीमुळे आजुबाजुच्या नागरीकांचे व त्या परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. लहान मुले व वयोवृध्द लोक सतत आजारी पडत आहे.तरी मुख्याधिकारी यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेवून 7 दिवसाच्या आत कार्यवाही करून सहकार्य करावे अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व औसा शहरातील नागरिक नगर पालिकेसमोर संविधानिक मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज दिनांक 4 अॉक्टोंबर मंगळवार रोजी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहराज शेख, अँड.शिवाजी सावंत, अँड सय्यद मुस्तफा इनामदार,संताजी राजकुमार औटी,उमर पंजेशा, संगमेश्वर उटगे,गजेश्वर राजे शिंदे आदि उपस्थित होते.
0 Comments