औसा तालुक्यातील मौजे टाका येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
औसा प्रतिनिधी
नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज दि.३०-१०-२०२२शिबिराचा तिसरा दिवस.....
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिव प्रतिष्ठान शिवली तसेच मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई आणि एच.व्ही देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मौ.टाका ता.औसा जिल्हा लातूर या ठिकाणी आज रोजी संपन्न झाले.शिबीराचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक मा.सरपंच रामचंद्र भाऊ शिंदे यांच्या हस्ते आणि आयोजक सौ.रेखा शिवकुमार नागराळे मा.उपसभापती पंचायत समिती औसा तथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना राज्य उपाध्यक्ष तसेच मनसे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.व्यासपीठावर मनसे जिल्हा सचिव धनराज गिरी,तालुका सचिव जीवन जंगाले,कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सोमेश्वर नागराळे, गुणवंत लोहार,समाधान जोगी,समाधान गोरे,जीवन शिंदे,डॉ.राजूखान सय्यद,डॉ.अजय यादव इत्यादी उपस्थित होते.आज रोजी संपन्न झालेल्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असता त्यापैकी २६ रुग्णांना मोतीबिंदू व इतर डोळ्याच्या आजाराची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉ. राजूखान सय्यद,व डॉक्टर अजय यादव यांनी सांगितले असून सदरील रुग्णाची शस्त्रक्रिया ही थोड्याच दिवसात एच, व्ही,देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर पुणे येथे करण्यात येणार आहे.
0 Comments