परिवर्तनवादी विचाराच्या मुशीत तयार झालेल्या
कोरे यांच्या समर्पणाने चळवळींना उंची मिळाली !
- प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे.

          लातूर, दि.१२, परिवर्तनवादी विचारांच्या मुशीत तयार झालेल्या, दिवंगत वैजनाथ कोरे यांच्या समर्पित बांधिलकीने, येथील विविध सामाजिक चळवळींना एक उंची लाभली, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी केले. ते ११ ऑक्टोबर रोजी हॉटेल अंजनी सभागृहामध्ये, महाराष्ट्र अंनिस लातूरच्यावतीने, दिवंगत कोरे यांच्या तिस-या स्मृति संकल्प अभिवादन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या, कार्यक्रमामध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते तथा विधिज्ञ मनोहरराव गोमारे हे होते.तर विचारमंचावर संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष माधव बावगे, सुनीताताई अरळीकर, बब्रुवानजी गोमसाळे व निर्भय कोरे यांची विशेष उपस्थिती होती.
          पुढे बोलताना डॉ.रोडे हे म्हणाले की, एखाद्या गाव-शहराची ओळखही अशाच कृतृत्वाने अधोरेखीत होत, एक स्वतंत्र वैभव प्राप्त करून देत असते.यास त्यांनी थोर साहित्यिक व राजनितीज्ञ दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि उपकारकार लक्ष्मण माने यांच्या पूर्व संवादाचा हवाला पण दिला. सतत अंधाराशी सामना करून, समाज जीवनात प्रकाशाची उधळण करणा-या, वैजनाथरावानी संघटनेच्या लातूर शाखेला एक तपापेक्षा अधिक काळ, राज्यात गुणवत्तेने प्रथमस्थानी ठेवण्याची दीर्घकाळ परंपरा राखली. प्रपंच आणि सामाजिक परमार्थ कसा नेटका असावा, याचे एक उदाहरण ठरलेल्या कोरे यांच्या, सामाजिक बांधिकी आणि वैचारिक जाणिवेची, विचार पालखी आपण संबध राज्यभर वाव्हू या असे ही  ते म्हणाले. तर महाराष्ट्र अंनिसचे राज्यकार्याध्यक्ष माधव बावगे हे म्हणाले की, कोरजींचा विनय आणि वक्तशीरपणा ही संघटनेला मिळालेली, एक अमुल्य देण आहे. आणि आजही आम्ही त्यांच्या त्याच प्रभावाखाली काम करतोत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड.मनोहरराव हे म्हणाले की, युक्रांद मधून आलेले कोरे हे आपल्या विचार ध्येयाशी अत्यंत प्रामाणिक व निष्ठावंत होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी नाशिक कारागृहातील १४ महिन्याच्या, कारावासात ते अत्यंत सक्रीय होते, असे त्यांनी सांगीतले. यावेळी सुर्यकांत वैद्य, श्री विठ्ठल शेळके, ज्येष्ठ नाटय दिग्दर्शक बाळकृष्ण तात्या धायगुडे, बब्रूवान गोमसाळे, रहेमान मणियार, बी.आर. पाटील, शिवाजीराव शिंदे, रामकुमार रायवाडीकर व रामचंद्र तांदळे यांनी, स्मृती व संकल्प मनोगत व्यक्त केली. तसेच कोरे यांच्या विचार व कार्याची सर्वत्र ओळख व्हावी म्हणून, त्यांच्यावरील स्मृतिग्रंथास अधिक गती देऊन, त्यांच्या नावे राज्यस्तरीय पुरस्कार, व्याख्यानमाला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आदींच्या नियमीत आयोजन करण्याचे ठरले आहे.
          प्रारंभी दिवंगत वैजनाथ कोरे यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या पुष्पहार अर्पण करून, त्यांना
 सामूहिक अभिवादन करून स्तब्धतेची आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कार्यालयीन व्यवस्थापक उत्तरेश्वर बिराजदार यांनी केले. तर जिल्हाकार्याध्यक्ष अनिल दरेकर व राज्य सरचिटणीस रुक्साना मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले. निर्भय कोरे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी प्रतिभा गोमसाळे, प्रा.डॉ.दशरथ भिसे, अनवले, संजय व्यवहारे, पुष्पाताई कोरे, दिलीप अर ळीकर, बालाजी माने, राजेश पाटील, राहूल कुलकर्णी, अनिरुद्ध सिरसीकर, प्रा.डॉ.धुळेकर, भीमसेन म्हेत्रे, रणजीत आचार्य, प्रा.सुधीर अनवले,गंगाधर गवळी श्याम वरियाणी आदी उपस्थित होते.
  महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेच्यावतीने,११ ऑक्टोबर रोजी दिवंगत वैजनाथ कोरे यांच्या तृतिय स्मृतिदिना निमित्ताने, हॉटेल अंजनी सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या, स्मृति संकल्प अभिवादन सभेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना- प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, विचारपीठावर अध्यक्ष-मनोहरराव गोमारे, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, निर्भय कोरे, सुनिता अरळीकर आदि  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments