उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये औसा शहरातील होर्डिंग हटवले 
औसा प्रतिनिधी 
औसा नगर परिषदेच्या वतीने औसा शहरात ठीक ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले होते. शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच मुख्य रस्त्यावर व शहरातील विविध चौकामध्ये डिजिटल होर्डिंग लावण्यात आले होते परंतु हे सर्व होर्डिंग उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काढून घेण्यात येत आहेत. आगामी काळामध्ये नगरपरिषद हद्दीमध्ये नगर परिषदेच्या परवानगी शिवाय कोणालाही अशा प्रकारचे फोर्डिंग लावता येणार नाहीत. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार येणाऱ्या काळात डिजिटल बॅनर होर्डिंग वर क्यू आर कोड टाकावा लागणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर सदरील बॅनर किंवा होर्डिंग चा परवाना किती दिवसाचा आहे व नगरपालिकेला त्या बदल्यांमध्ये किती रक्कम भरणा केली याची सर्व माहिती मिळणार असल्याने हायकोर्टाच्या आदेशानुसार शहरातील सर्व डिजिटल बॅनर व होर्डिंग काढण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे .त्यामुळे येणाऱ्या काळात नगरपरिषदेच्या पूर्वपरवानगीशिवाय शहरात कोणालाही डिजिटल बॅनर किंवा होर्डिंग लावता येणार नाहीत तरी नागरिकांनी डिजिटल बॅनर किंवा होर्डिंग लावताना नगरपरिषदेचा परवाना रिसर्च शुल्क भरून घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे व अतिक्रमण प्रमुख अजय बनसोडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments