औसा पालिकेच्या सफाई कामगारांचा काम बंद करून ठिय्या
औसा प्रतिनिधी
औसा नगर परिषदेअंतर्गत सफाई चे काम करणाऱ्या सफाई मजुरांना मागील तीन महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनी औसा येथील लातूर वेस हनुमान मंदिराजवळ ठिय्या मांडून काम बंद आंदोलन पुकारले. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये या मजुरांनी औसा शहराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करून नगर परिषदेला पुरस्कार मिळवून दिला परंतु दिपवाळीचा सण तोंडावर आला असताना दोन-तीन महिन्यापासून सफाई मजुरांना पगार न मिळाल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी ठिया आंदोलन करून काम बंद पाडले. कंत्राटी पद्धतीने सफाईचे काम करणाऱ्या या मजुरांकडून जास्त काम घेऊन मजुरांची हेळसांड केली जात असल्याचे तक्रार सकाळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मजुरांनी व्यक्त केली. कंत्राटदार यांनी सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्हाला काम करावे लागेल असे सांगितले होते परंतु सकाळ आणि दुपारच्या टप्प्यामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत या मजुरांकडून काम करून मजुरांची पिळवणूक केली जात असल्याचे प्रतिक्रिया मजुरांनी व्यक्त केली. या कामी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी तातडीने उचित कार्यवाही करून कंत्राटी पद्धतीने सफाईचे काम करणाऱ्या मजुरांना सणा निमित्त त्वरित पगार देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
0 Comments