ईद -ए - मिलादुन्नबीच्या निमित्ताने औशात शरबत वाटप
औसा प्रतिनिधी
संपूर्ण जगाला शांती व समतेचा संदेश देणारे
इस्लाम धर्माचे प्रेषित पैंगबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु व अलैही वसल्लम यांच्या जश्ने ईद-ए - मिलादुन्नबीच्या निमित्ताने व अॉल इंडीया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लमीन औसाच्या वतीने शरबत वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.याच अनुषंगाने 9 आॅक्टोंबर रविवार रोजी हाशमी चौक औसा येथे एम आय एम पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष अँड. गफुरुल्लाह हाशमी यांच्या अध्यक्षतेखाली औसा शहरातील नागरीकांसाठी शरबत वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले. या शरबत वाटप कार्यक्रम मध्ये औसा शहरातील नागरीकांनी या शरबताचा लाभ घेतला. यावेळी या कार्यक्रमात एम आय एम चे शहराध्यक्ष सय्यद कलिम, शहरकार्याध्यक्ष शेख अतिक ,देशमुख शकील , सय्यद जमीर,कुरेशी उजेफ,पटवेकर मुक्तदीर, इमरान सौदागर, शेख अहेमद, आदि एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments