औसा येथे
मुक्तेश्वर मंदिरात संगीत दरबार

औसा  प्रतिनिधी
दि. 15  ऑक्टोबर  2022

        मुक्तेश्वर देवालय न्यास  औसा द्वारा आयोजित  औसा येथील  मुक्तेश्वर मंदिरात  रविवार  30  ऑक्टोबर रोजी  संगीत दरबार  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून  सकाळी सात ते सायंकाळी सात असे बारा  तासाचा अखंड स्वराभिषेक  संपन्न होणार आहे.
       यावेळी  औसा येथील माऊली संगीत विद्यालयाचे विद्यार्थी, हभप चंदू महाराज आळंदीकर, दिनेश पोखरकर, ओंकार चव्हाण, कैवल्य पांचाळ, अक्षय पांचाळ,  पांडुरंग केसरकर, बसवेश्वर गजभार स्वामी, गजेंद्र जाधव, व्यंकटराव राऊतराव, नरशिंग राजे, हणमंत लोकरे, सुनिक चेलकर, राजाभाऊ  जंगाले यांच्यासह अनेक नामवंत गायक, वादक आणि स्वेता पाटील व त्यांचे शिष्य कथ्थक नृत्य सादर करणार आहेत.
       या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन औसा येथील मुक्तेश्वर देवालय न्यास व
माऊली संगीत विद्यालय औसा च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments