नुतन गटविकास अधिकारी म्हेत्रे यांचा  रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गोंविद शिंदे यांनी केला सत्कार

औसा प्रतिनिधी

 औसा पंचायत समितीचे नुतन पुर्णवेळ गटविकास अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले नुतन गटविकास अधिकारी म्हणून युवराज म्हेत्रे यांची नियुक्ती झाली. त्यांनी यापूर्वी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त कार्यालय, अमरावती, गटविकास अधिकारी तालुका नेर, जि यवतमाळ व  माहूर, जि नांदेड येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून कार्य केले असून सर्व अधिकारी यांच्यावर एक मजबूत पकड ठेवणारे शिस्तबद्ध,व कार्यतत्पर अधिकारी अशी ओळख यांची आहे. आज ते पंचायत समिती मध्ये आल्यावर औसा तालुक्यातील रोजगार सेवक यांच्या हक्कासाठी झगडणारे ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य 5775  चे औसा तालुकाध्यक्ष गोंविद बाबुराव शिंदे यांनी भेट घेऊन गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार केला.यावेळी मोठ्या संख्येने रोजगार सेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments