औसा नगरपरिषद मार्फत प्लास्टिक वर  बंदीची दंडात्मक कारवाई
औसा प्रतिनिधी 
 आज नगरपरिषद औसा मार्फत औसा शहरातील व्यवसायिक आस्थापना मार्केट मध्ये प्लास्टिक  बंदी व दंड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत अंदाजे १५० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच विविध व्यावसायिक दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २७५००/- दंड वसूल करण्यात आले.
औसा शहरातील सर्व नागरिकांनी व व्यावसायिक दुकानदारांनी महाराष्ट्र शासन घातलेल्या प्लास्टिकचा वापर टाळावा अन्यथा आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आव्हान नगरपरिषद मार्फत करण्यात आले.
या मोहिमेमध्ये कार्यालयीन अधीक्षक श्री पाटील प्रदीप, स्वच्छ भारत अभियान चे शहर समन्वयक श्री सौदागर अहमद, जप्ती चे प्रमुख श्री अजय बनसोडे तसेच नगरपरिषद मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments