टाका येथील दोन भावांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील टाका येथील भूमिपुत्र महाराष्ट्र केसरी मध्ये उपविजेता ठरलेला शैलेश शेळके आणि त्यांचे सख्खे बंधू अक्षय शेळके या दोन्ही संख्या भावांशी आता होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मागील वर्षी शैलेश शेळके यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये उपविजेता पद पटकाविले होते. या वर्षी परत त्यांची व त्यांचे बंधू अक्षय शेळके यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वर्णी लागली असून औसा तालुक्यातील कुस्तीपटूं आणि क्रीडा प्रेमी नागरिकांतून अभिनंदन होत आहे. शैलेश शेळके यांच्या यशाबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या होत्या. आता औसा तालुक्यातील टाका येथील शेळके बंधूंची निवड झाल्यामुळे औसेकरांच्या अपेक्षा उंचावले आहेत.
0 Comments