सेलू गावातील अंतर्गत रस्ते पेव्हर ब्लॉक मुळे चमकू लागले
 औसा प्रतिनिधी 
औसा तालुक्यातील सेलू ग्रामपंचायतने गावातील अंतर्गत रस्त्याचा विकास करण्याची उत्कृष्ट मोहीम हाती घेतली असून गावातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक च्या माध्यमातून रस्त्याचे सुशोभीकरण केले आहे. ग्रामपंचायत मंदिर परिसर शाळा आणि स्मशानभूमी परिसराच्या विकासाला चालना दिली आहे. ग्रामपंचायत मध्ये सौ. कविता कदम सरपंच म्हणून काम करतात. तर त्यांना ग्रामसेवक श्रीमती कुलकर्णी यांचे सहकार्य मिळत आहे. सरपंच आणि ग्रामसेवक महिला असल्यामुळे गावातील विकासाचा केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अंतर्गत रस्ते पेव्हर ब्लॉकने तयार केल्यामुळे सेलू गावातील रस्ते चमकत आहेत. स्मशानभूमी परिसरामध्ये यावर्षी वृक्ष लागवड केली असून ग्रामपंचायतीने वृक्ष संवर्धनाची व वृक्ष जोपासण्याची जबाबदारी घेतली आहे. ग्रामस्थांच्या सुविधासाठी रस्त्याची हाती घेतलेली मोहीम आणि कामाचा दर्जा यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या कामाचे ग्रामस्थातून कौतुक होत आहे. या कामी उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन विकास कामे होत असल्याने गावाच्या विकासाला नागरिकांतून सुद्धा प्रोत्साहन मिळत आहे.

Post a Comment

0 Comments