माकणी धरण भरल्याने दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू
औसा प्रतिनिधी
माकणी येथील निम्मतेरणा प्रकल्प संपूर्णतः भरून मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाल्याने धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. दिनांक 13 व 14 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाल्याने मागणी धरणात जलसाठा निर्माण झाला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. औसा लोहारा, उमरगा, निलंगा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप सोयाबीन उडीद तूर सूर्यफूल ऊस ही पिके पाण्यात गेले आहेत. औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहेत. तर हरेगाव नजीक पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली. हरेगाव, लिंबाळा, गोपाळ नांदुर्गा, सारणी, हसलगन, जवळगा वाडी या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटल्याने जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झाले आहे.
0 Comments